धारूर महाविद्यालयामध्ये संत सेवालाल जयंतीनिमित्ताने अभिवादन

किल्ले धारूर 15 फेब्रुवारी रोजी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्ताने प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख प्रा. मांगीलाल राठोड यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी व्याख्यानातून संत सेवालाल महाराज व्यक्ती, कार्य आणि कर्तुत्वाची माहिती दिली. या अध्यक्षीय मनोगतातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे यांनी मनोगतातून संत सेवालाल यांचे कार्य समाजाला दिशादर्शक व विकासाकडे घेऊन जाणारे होते असे सांगितले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. महादेव जोगडे, उपप्राचार्य मेजर डॉ. मिलिंद गायकवाड, आक्यूएसी समन्वयक डॉ. एल. बी. जाधवर, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. विनायक कापावार तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन प्रा. विनायक कापावार यांनी केले तर आभार डॉ. नितीन कुंभार यांनी मानले.

One thought on “धारूर महाविद्यालयामध्ये संत सेवालाल जयंतीनिमित्ताने अभिवादन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *