सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट बंद ची हाक देण्यात आली आहे. केज मध्येही उद्या संपूर्ण दिवस कडकडीत बंद
केज तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने
मनोज जरांगे पाटील यांचे अमरण उपोषण सुरू आहे. त्यांनी औषधोपचार व पाणीही त्यागले असल्याने त्यांची प्रकृती खालावत आहे. अशा वेळी शासनाने त्यांच्या मागण्यांसाठी तात्काळ पावले उचलावीत या मागणीसाठी 14 फेब्रुवारी रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट बंद ची हाक देण्यात आली आहे. या निमित्ताने केज मध्येही उद्या संपूर्ण दिवस कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने केज शहरातील सर्व व्यापारी बांधव, छोटे व्यापारी, भाजी-फळे विक्रेते यांनी या बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सकाळी ठीक अकरा वाजता सर्व सकल मराठा समाज बांधवांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपस्थित राहावे. तेथून तहसील कार्यालयावर जाऊन शासनाने तात्काळ कार्यवाही करण्यासाठी निवेदन देण्यात येणार आहे. तरी सर्वांनी हा बंद शांततेत यशस्वी करण्याचे आवाहन केज तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.