खा.शरदचंद्र पवार लवकरच अंबाजोगाईत येणार – प्रा.ईश्वर मुंडे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सेवा निवृत्त कर्मचारी अधिकारी सेलचे मराठवाडा विभागीय अधिवेशन फेब्रुवारी 2024 च्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च 2024 च्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री.शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे.
या अधिवेशनास प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपण उपस्थीत राहावे असे निमंत्रण खा.शरदचंद्र पवार यांना मोदीबाग पुणे येथील त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी बीड जिल्हाध्यक्ष आ.संदिप क्षीरसागर यांच्या संमतीने राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी सेल चे राज्य प्रमुख प्रा.ईश्वर मुंडे यांनी प्रत्यक्ष भेटून दिले आहे.
सदरील निमंत्रणाचा स्वीकार करून अंबाजोगाई येथे घेण्यात येणाऱ्या अधिवेशनास उपस्थीत राहाणे बाबत खा.शरदचंद्र पवार यांनी संमती दिली आसल्याचे राज्य प्रमुख प्रा.ईश्वर मुंडे यांनी प्रसिध्दी माध्यमांना सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *