अफार्म – पुणे संस्थेच्या सचिव पदी एच पी देशमुख यांची निवड
महाराष्ट्र राज्यातील अनेक सामाजिक संस्थेचे नेटवर्क उभारलेल्या व विविध उपक्रम व प्रकल्प उल्लेखनीयरित्या राबविणारी आणि अनेक सामाजिक संस्थांचा विकास प्रक्रिया व क्षमता बांधणी करणारी, दिशादर्शक संस्था म्हणून लौकिक असलेल्या शिखर संस्था अफार्म, पुणे या नामांकित संस्थेच्या सचिवपदी एच पी देशमुख यांची सर्वाधिक मताने निवड झाली.
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रातील गावांना पिण्याचे पाणी आणि कृषी विस्तार सेवा पुरविण्याच्या त्यांच्या कार्यांमध्ये गैर-सरकारी संस्थांच्या (NGO) प्रयत्नांना समन्वयित करण्यासाठी शिखर संस्थेच्या तीव्र गरजेतून AFARM चा 1967 साली जन्म झाला. देशातील सर्वोच्च संस्था म्हणून काम करणारी ही पहिली संस्था आहे.
याच संस्थेच्या कार्यकारणीची दिनांक ०९ फेब्रुवारी २०२४ रोजी निवडणूक झाली यात कृषी विद्यापीठ अकोले चे माजी कुलगुरू डॉ. व्यंकटेश मायंदे – अमरावती यांची अध्यक्षपदी, डॉ. मधुकर गुमळे – अमरावती- उपाध्यक्ष, एच पी देशमुख बीड – सचिव , डॉ. सुद्धा कोठारी पुणे – कोषाध्यक्ष , लालासाहेब आगळे बीड – सदस्य, संतोष राउत – सोलापूर, शहाजी गडहिरे सातारा – सदस्य, आदिनाथ ओंबळे
सातारा – सदस्य, डॉ. किशोर मोगे यवतमाळ – सदस्य, गिरीजा गोडबोले पुणे – सदस्य, रोहिणी करमुडी पुणे – सदस्य. या सदस्याची बहुमताने निवड करण्यात आली.
अफार्म – पुणे संस्थेचे सचिव पद हे मराठवाड्याकडे आले ही एक अभिमानाची गोष्ट आहे. एच पी देशमुख हे युवा ग्राम विकास मंडळ केज या संस्थेच्या माध्यमातून गेली ३९ वर्ष झाले ग्रामीण विकासाबरोबर शेती आणि पाणी प्रश्नवर या नैसर्गिक साधन संपत्तीवर अवितरत काम करत आहेत. तसेच विविध नेटवर्क मध्ये सरांचे काम सक्रीय आहे.
अफार्म पुणे संस्थेच्या सचिव पदी निवड झाल्याने विविध क्षेत्रातील मान्यवर प्रत्यक्ष भेटून व मोबाईल फोन द्व्यारे सुभेच्छा देत आहेत. दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी केज तालुक्यातील युवा ग्राम संस्था नेटवर्क सदस्य ज्योती सांबरे, विजयाताई कांबळे, अंजली जगदेव, सुनिता विभूते, संतोष रेपे – युवा ग्राम निवेदिता बाळमारे, संजीव आगळे, बाबा वडवे – सोलापूर, वसंतराव जाधव- पत्रकार, प्रकाश काळे, शरद गिरम, रणजीत घाडगे – पत्रकार, प्रा. हनुमंत सौदागर- पत्रकार, प्रा.कल्पना जगदाळे, दत्तात्रय हंडीबाग – पत्रकार इ. व्यक्तींनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. तसेच अफार्म मार्फत एम एन कोडलकर यांनी सत्कार केला तर शिवाजी तायडे – जालना, अप्पासाहेब उगले – औरंगाबाद यांनी शुभेच्छा दिल्या. महावन संस्था नेटवर्क कडून , दत्ता पाटील – नागपूर दिलीप बारसागडे – गडचिरोली , अमित नाफडे – बुलढाणा, नितीन परांजपे – नाशिक, गौरी देशपांडे – नागपूर , मोहन सुर्वे – मुंबई , घ्यार पाटील – हिंगोली, प्रमोद देशमुख – नांदेड, पालकर – बुलढाणा. आशा संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वस्तरावर अभिनंदन होत आहे.