सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश आणि किल्ले धारूर सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे,यांची धडक कारवाई

केज येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मिना आणि किल्ले धारूर सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे, यांनी धाडसी कारवाई करून गांजाची वाहतूक करीत असलेला ट्रक आडस मध्ये ताब्यात घेत त्यातील ११७ कितो ग्रॅम गांजा ताब्यात

बेकायदेशीररित्या व विनापरवाना चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने एका वाहनातून वाहतूक करताना पोलीस पथकाने पाठलाग करून केलेल्या कारवाईत एक क्विंटल सतरा किलो गांजा सह पाच जणांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई अंबाजोगाई – आडस रस्त्यावर आडस येथे करण्यात आली.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिक्षक कमलेश मीना, सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक गोविंद बास्टे, प्रशांत मस्के, जमीर शेख, विकास चोपने, अशपाक इनामदार, नाना निंगुळे, नितिन काळे, परमेश्वर वखरे, धम्मानंद गायसमुद्रे, मुकेश खरटमोल, मल्लिकार्जुन माने, श्रीमती दिक्षा चक्के, तुकाराम चांदणे यांचा समावेश असलेल्या पोलीस पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *