आंबेवडगाव येथील शेतकरी, ऊसतोड कामगारांचे दोन तरुण झाले तलाठी!
धारूर तालुक्यातील आंबेवडगाव हे गाव तीन हजार लोकसंख्या असलेले गाव आहे याच गावातून गेल्या वर्षी आठ पोलीस तयार करून शासन सेवेत रुजू झालेली आहेत शेतकरी, ऊसतोड कामगारांच्या मुलांनी आपल्या आई-वडीलांचे कष्ट संघर्ष डोळ्यासमोर ठेवून पोलीस भरतीत स्थान मिळवले आहे. धारूर तालुक्यातील आंबेवडगाव येथील एक दोन नाही तर तबल आठ विद्याथ्यांनी पोलीस होण्याचे आई- वडीलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. यामध्ये दोन मुली व सहा मुलांचा समावेश आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
धारर तालुक्यातील आंबेवडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व न्यू हायस्कूल आंबेवडगाव येथे गावातच शिक्षण घेतले. गावातच अभ्यासिका असल्यामुळे गोरगरीब लोकांना या अभ्यासिकेचा फायदा झालेला आहे पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी इतर ठिकाणी प्रवेश घेत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. जिद, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर आपल्या आई-वडीलांचा संघर्ष डोळ्यासमोर ठेवून पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगले.आणि ते स्वप्न पूर्णही केले. पोलीस दलात
नोकरदारांचे गाव म्हणून आंबेवडगाची केली ओळख या गावातील शिक्षक, वकील, तलाठी, वनरक्षक यांच्यासह पोलीस भरती, सैन्य भरती, महसूल विभाग आदी ठिकाणी नैकरदार कार्यरत आहेत तसंच १५ पेक्षा अधिक अधिकार आहेत त्यामुळेच नौकर दाराचे गाव म्हणून आंबेवडगाव ची ओळख या परिसरात झालेली आहे 2023 मध्ये तलाठी भरती परिक्षा घेण्यात आल्या होत्या त्यांची अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली त्यामधे ओपन मधून रंजणी कांत नायकोडे यांची सिंधूदूर्ग तर बालासाहेब ना
कोडे यांची बीड जिल्ह्यात तलाठी या पदावर निवड झाली आहे आई वडील राञ दिवस ऊस तोडूण शिक्षणा साठी पैसा खर्च करत होते . तर गेल्या वर्षी
यांची पोलीस भरतीत निवड झाली आहे
कोमल बालासाहेब नायकोडे(ठाणे शहर), विकास विष्णु भोजणे (पुणे शहर), गोविंद नारायण नायकोडे (अकोला), समाधान लक्ष्मण वाव्हळ(पालघर), सुनित ज्ञानेश्वर घोळवे ( ठाणे ) अक्षय बाबासाहे घोळवे (मुंबई पोलीस), विशाल अनंत तिडके (मुंबई पोलीस), सुनिता हनुमंत मुरकुटे
सोलापूर शहर) यांची पोलीस दलात निवड झाली आहे. यांच्या या यश बदल गावकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .