आंदोलनात सहभागी झालेल्या किल्ले धारूरच्या सर्व कारसेवकांचा श्री राम जन्मोत्सव समिती किल्ले धारूरच्या वतीने सत्कार
किल्ले धारूर शहरातून 6 डिसेंबर 1992 रोजी विवादित बाबरी ढाचा तेथे जमलेल्या कारसेवकांनी नेस्तनाबूत करून बाबरीचे नाव नष्ट केले आणि श्री रामजन्मभूमीला अभूतपूर्व आणि अविस्मरणीय आंदोलनात किल्ले धारूर शहरातून सहभागी झालेल्या सर्व कारसेवकांचा श्री राम जन्मोत्सव समिती किल्ले धारूरच्या वतीने दिनांक 22 जानेवारी ठिक 5 वाजता स्थळ हनुमान चौक येथे सत्कार करण्यात येणार आहे.
1990 व 1992ला श्रीराम जन्मभूमी आंदोलनात संपूर्ण भारतातून विश्व हिंदू परिषद च्या आव्हानाला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता व 6 डिसेंबर 1992 ला विवादित बाबरी ढाचा तिथे जमलेल्या कारसेवकांनी नेस्तनाबूत केला होता व बाबरी चे नाव नष्ट केले व श्रीराम जन्मभूमी मुक्त केली त्या अभूतपूर्व अविस्मरणीय आंदोलनात आपल्या किल्ले धारूर नगरीतून कट्टर हिंदुत्ववादी अनेक तरुण व जेष्ठ रामभक्त कारसेवक व महिला करसेवक ही सहभागी झाले होते व त्या वेळेस बऱ्याच जणांना तिथं अटक ही झाली होती.श्रीराम जन्मभूमी मुक्त करून त्याच जागेवर श्रीराम लल्ला ची प्राणप्रतिष्ठा करायची हा सर्व हिंदूंचा अस्मितेचा विषय होता व त्या जागेवरच श्रीराम मंदिर पुनर्निर्माण करायचे हे एक दिव्य स्वप्न सर्वांचे होते.
त्या वेळेस च्या आठवणी व दिलेला अनमोल वेळ कारसेवकांना न विसरणारा होता या आंदोलनात सहभागी झालेल्या किल्ले धारूर च्या सर्व कारसेवकांना श्रीराम जन्मोत्सव समिती किल्ले धारूर च्या वतीने यथोचित सत्कार करून गौरविण्यात येणार आहे व श्रीरामाची महाआरती होईल.
तरी सर्व श्रीराम भक्तांनी व सर्व कारसेवकांनी सहकुटुंब आणि नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे ही आवाहान श्री राम जन्मोत्सव समिती किल्ले धारूरच्या वतीने करण्यात येत आहे.