तेलगाव-माजलगाव रस्त्याच्या कामास सुरुवात !
माजलगाव रस्त्यांवर सातत्याने अपघात होऊन निष्पाप लोकांचे जीव गेले,कित्येक जण जखमी झाले.रस्ते प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात होते.या प्रश्नासंदर्भात १५ जानेवारी रोजी महायुतीच्या वतीने भव्य रस्ता रोको केल्यानंतर प्रशासनाने दोन दिवसात रस्त्याच्या कामास सुरुवात करण्याबाबत लेखी आश्वासन दिले होते.
दोन दिवसांपासून प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे,रस्त्यांवर पडलेल्या भेगा बुजवण्याचे प्राथमिक काम सुरू आहे.रस्त्यांच्या दोन्ही रस्त्यांवर आलेली झाडे तोडून वाहतुकीस मार्ग मोकळा झाला आहे.