चलो मुंबई चलो मुंबई चलो मुंबई चलो क्रांतीचे भागीदार, साक्षीदार, सहभागी व्हा : – अमोल जगताप
मराठा बांधावाला कळ कळीची विनंती आहे हि वेळ घरात बसण्याची नाही आपल्या तारुण्याच्या काळात होत असलेल्या या क्रांती चे भागीदार, साक्षीदार व्हा सहभागी होण्यासाठी बाहेर निघा.
मा. मनोज जरागे पाटील मागील सहा महिन्यांपासून स्वताचे घरदार, आईवडिल, बायको मुल बाळ सर्व काही सोडुन जातीसाठी समाजासाठी स्व ताचे प्राण तळहातावर घेऊन उपोषण ,आंदोलन करत आहेत ते कोणासाठी आपल्यासाठीच मग आज करो या मरो चा प्रसंग आहे यावेळी आपन आपल घरदार सोडून आठ दिवस पण जातीसाठी , समाजासाठी,मुलाबाळांच्या भविष्यासाठी वेळ देऊ शकत नसाल तर हा आपला नामर्दपना आहे.
सर्व कामे बाजूला सोडा बाहेर निघा आणि दाखवा जरांगे पाटील हि एक व्यक्ती नसुन 6 कोटी मराठा आहे .असे आवाहान मराठा युवक अमोल जगताप यांनी केले.
मा. जरांगे यांच्या सारखे नेतृत्व समाजासाठी मिळणे ही खूप मोलाची गोष्ट आहे.
मराठा समाजातील सर्वांनी मग ते कुठल्याही पक्षाशी बांधील न राहता मराठा नेतृत्व म्हणून जरांगे यांना पाठिंबा देणे ही खरी गरज असून त्याशिवाय सरकार मराठ्यांच्या बाजूने योग्य निर्णय देणार नाही.