किल्ले धारूर येथील सीताची नाहणी व रामकुंड येथे महास्वच्छता अभियान राबवण्यात आले
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रभाई मोदीजी यांच्या प्रेरणेतून श्रीराम प्राणप्रतिष्ठान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोदीजींनी जनतेला केलेल्या आव्हानानुसार आपल्या जवळील परिसरातील मंदिरात महास्वच्छता अभियान राबवण्याच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून किल्ले धारूर येथील सीताची नाहणी व रामकुंड येथे भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा नगराध्यक्ष डॉ.स्वरूपसिंह हजारी यांच्या माध्यमातून सर्व राम भक्तांना एकत्र घेऊन महास्वच्छता अभियान राबवण्यात आले व या परिसरातील मंदिरास रंगरंगोटी करुन नूतनीकरण करण्यात आले.