अयोध्यातील राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावर धारूर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
सोमवार दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्यातील राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावर श्री हनुमान मंदिर मेन रोड धारूर या ठिकाणी प्रभू रामचंद्राची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे धारारू नगरीचे प्रसिद्ध शिव कथाकार हरिभक्त परायण आशिषानंदजी महाराज
भव्य मिरवणूक भव्य मिरवणूक भव्य मिरवणूक शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता.
श्री च्या मूर्तीची आगमन शोभायात्रा हरिभक्त परायण आशिषानंदजी महाराज यांच्या निवासस्थान केज रोड पासून हनुमान मंदिरापर्यंत काढण्यात येणार आहे.
तरी सर्व माता-भगिनींनी कलशासह छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उपस्थित रहावे ही नम्र विनंती
रविवार दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी देवता स्थापना व हवन चे आयोजन करण्यात येणार आहे
तरी सर्व भावी भक्तांनी हवनाकरता उपस्थित रहावे ही नम्र विनंती
सोमवार दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी सकाळी आठ वाजता श्रींची रथा मधून मिरवणूक काढण्यात येणार आहे व एक वाजून 37 मिनिटांनी प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम संपन्न होईल
प्राणप्रतिष्ठानंतर महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी सर्व किल्ले धारूर तालुक्यातील सर्व भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात येत आहे.