“१९७२चा दुष्काळ आणि आमची परिस्थिति..( सत्य घटना)” : – लेखक दिलीप कापसे
१९७२चा महाराष्ट्रात पडलेला दुष्काळ मला चांगलाच आठवतो. मि त्या वेळेस इयत्ता ७वित शीकत होतो. घरची परिस्थिति बेताचीच, घरात सरकारी नौकरी कोणालाच नाही.. माझ्या पेक्षा मोठे भाऊ तिन ते पण शिक्षण घेत होते..
वडीलांचा कापडाचा व्यवसाय.. दुष्काळा मुळे धंद्याची वाताहात लागलेली.. रोजचे खाण्याचे वांदे.. १९७२ला महाराष्ट्राचे मुख्य मंत्री वसंतराव नाईक (वीदर्भ यवतमाळ जिव्हा, पुसद) हे होते. त्यांनी रोजगार हमीचे कामे काढली.. आमच्या गावातिल ९० टक्के लोक रोजगार हमी योजनेच्या कामावर जात असत.. रोडची कामे जवळपास सगळी कडेच होती. तळे, विहिरी कोरडी पडली होती.. तळ्यातील गाळ काढण्याचे कामे खेड्यापाड्यात चालू होती.. पाण्याची टंचाई, अन्नधान्याची टंचाई चांगलीच भासत होती.. भारत सरकारणे अमेरिकेतुन हायब्रीड, मिलो आणि लाल गहु जे कि जनावरे पण खात नसत असा गहु
महाराष्ट्रातिल लोकांनी नाईलाजास्तव खाल्ला .. पिण्यास पानी नव्हते.. पाण्यासाठी नगरपालिकेची टॉकर येत होती.. तिन पैशाला एक घागर, ति पणलाईन लाऊनच..तिन पैशाची पावती घेऊन मिळत होती.
जनावरांना चारा, पाणी मिळत नव्हते. ब-याच शेतकर्यानी डोळ्यावर पट्टी बांधुन आपली जनावरे देवाच्या भरोशावर सोडुन दिली.. गाई, म्हशी, बैल पण्यावाचुन तरफडून मरताना शेतकर्यानी आपल्या डोळ्यांनी पाहिली.. दिवसाची मजुरी फक्त १.२५ पैशे मिळत होती.. स्त्रीयांना ७५पैशे रोज.. मला रोड वरती भावाच्या हाता खाली काम करण्याची वेळ आली होती. मि वयाच्या १२व्या वर्षी उन्हा तानात खडीचे टोपले उचलण्याची कामे करावी लागली..
सरकारणे सकस आहार म्हणुन सुकडी वाटली.. सुकडी म्हणजे गुळाचा कोरडा शिराच..
त्या दुष्काळात पैसाच दिसत नव्हता. हालाकिच्या परिस्थिति मुळे माझे ७विचे वर्ष वाया गेले.
१९७३ला बर्यापैकी पाउस झाला आणि दुष्काळाची तीव्रता थोडी कमी झाली.. तो पर्यंत आम्ही दुष्काळामुळे १०वर्ष मागे गेलो होतोत .. १९७५ला मि एस एस सी पास झालो. मला चांगलेच समजू लागले होते.. मोठा भाऊ मस्टर कारकुन या पदावर लागल.. पगार महिना १५०रु. १९७५ला १५०रुपये खुप वाटायचे.. मला कॉलेज म्हणजे काय माहितीच नव्हते.. शिक्षणाच्या बाबतीत मा दर्शन कोणाचेच नव्हते..१९७३ला आमच्या गावात परिवहन मंत्री रामरावजी आवरगावकर यांनी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कॉलेजची स्थापणा केली.. त्या वेळेस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आवरगावर साहेबच होते. मि कॉलेच मधे ऐडमिशन घेण्यासाठी गेलो, कोणत्या फॅकल्टीला एडमिशन घ्यायचे हे पण कळत नव्हते. कला का वाणिज्य.. माझे डाकुमेंटस् मी तिथे बसलेले वेल्हाळ सर जे कि कॉलेज मधे क्लर्क होते त्यांच्या स्वाधीन केले.. ते म्हणाले १५ दिवसानी कॉलेज सुरु होणार आहे.. तुझे एडमिशन झाले ११ विच्या पीरियडला बसायचे.. मि खुशीत घरी आलो.. १५ दिवसानी कॉलेज मधे गेलो, बसायचे कोणत्या वर्गात हेच माहीती नव्हते.. आर्ट कि कॉमर्स.. अॉफिस मधे जाऊन वेल्हाळ सरांना विचारले ते म्हणाले बघुन संगतो..
तो पर्यंत कॉमर्सचा पीरियड कर.. पीरियड संपल्या नंतर मला बोलावून घेतले तुझे एडमिशन कॉमर्स ला झाले.. त्या वेळेस एडमिशन फिस पाच रुपये होती.. उद्या येते वेळेस ५रुपये फिस घेऊन ये आणि पावती घेऊन जा.. नंतर मी त्याच कॉलेज मधे १९८०ला B, com पास झालो.
घरी कापडाचा व्यवसाय आसल्या मुळे वडलांन सोबत कापडाचा व्यापार करु लागलो.. नौकरी करण्याची इच्छा असुन सुद्धा नौकरी करता आली नाही.. मला १९८२ला स्टेट बँकेत नौकरी लागली होती.. आई वडलांचा नौकरीला विरोध होता..
घरी धंदा आसताना नौकरी कशाला करायची. आणि मि धंद्यात गुंतलो तो कायमचाच.
दुष्काळाची आठवण झाली की समोर चित्र दिसते. जुन्या कटु आठवणी ताज्या होतात.. या घटनेला ४९वर्ष झाली.
Realistic