अयोध्येतून आलेल्या मंगल अक्षता व निमंत्रणाचे प्रभु श्री रामचंद्र भक्तानी यांनी घरोघरी केले वाटप
अयोध्येतील प्रभू श्री रामचंद्र यांच्या मूर्तीला चरणस्पर्श करून रामलला प्रतिष्ठानकडून आलेल्या पवित्र मंगल अक्षता आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकांचे किल्ले धारूर शहरात प्रभु श्री रामचंद्र भक्तानी घरोघरी जाऊन वाटप केले.
अयोध्येत 22 जानेवारी रोजी हिंदूंच्या अस्मितेचे प्रतीक असलेला रामलल्ला भव्य मंदिरात विराजमान होणार आहे. यादिवशी थोड्या मंगल अक्षता आपल्या घरातील देव्हाऱ्यात वहाव्यात आणि थोड्या अक्षता जवळच्या मंदिरात जाऊन देवासमोर ठेवून त्यांची पूजा करावी. असे आव्हान प्रभू श्रीरामचंद्र भक्तांनी केले.
पहा