धारूर महाविद्यालयामध्ये विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्ताने व्याख्यान संपन्न

विद्यापीठ नामविस्ताराची चळवळ ही समाजाला सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक दृष्टिकोन देणारी होती. मराठवाड्यातील अगणिक युवकांनी नामविस्ताराचा लढा अखंडपणे तेवत ठेवून प्रसंगी बलिदानही दिले या संघर्ष लढयाच्या माध्यमातूनच 14 जानेवारी 1994 रोजी मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार झाला.
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ३० व्या विद्यापीठ नामकरण दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन कार्यक्रमाची सुरुवात व्याख्याते उपप्राचार्य मेजर डॉ. मिलिंद गायकवाड यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्प अर्पण करून अभिवादन करून करण्यात आली.

उपप्राचार्य मेजर डॉ. मिलिंद गायकवाड : –

या विद्यापीठाच्या स्थापनेमुळे मराठवाड्यातील दलित, पीडित, शोषित, वंचित आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सुविधा निर्माण झाली असे उपप्राचार्य मेजर डॉ. मिलिंद गायकवाड यांनी आपल्या व्याख्यानातून नमूद केले.

प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे : –

व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे यांनी विद्यापीठाच्या नामविस्तारामुळे जागतिक पातळीवरील श्रेष्ठ असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळाले. यामुळे संविधानाचे निर्माते, अर्थतज्ञ, कायदेतज्ञ आणि समाजाला स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या मूल्यांची देणगी देणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा यामुळे गौरव झाला आहे. या नामविस्तार दिनाच्या माध्यमातून सर्व प्राध्यापक, अभ्यासक व संशोधकांनी अध्ययन, अध्यापन आणि संशोधन क्षेत्रात अलौकिक कामगिरी करून विद्यापीठाचे नाव उज्वल करावे असा आशावाद व्यक्त केला.

कार्यक्रमाकरिता उपप्राचार्य प्रा. महादेव जोगडे, पर्यवेक्षक प्रा. सिद्धेश्वर काळे यांबरोबरच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी ऑनलाइन झूम ऍप द्वारे मोठ्या संख्येने जोडले गेले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. विनायक कापावार यांनी तर आभार डॉ. विठ्ठल केदारी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *