वसतिगृहांमुळे धारूर तालुक्यातील मुलांच्या शिक्षणाची सोय – प्रा.ईश्वर मुंडे
महाराष्ट्र शासनाने गेल्या वर्षी स्थलांतरीत ऊसतोड कामगारांच्या मुलां-मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतीगृह योजनेअंतर्गत राज्यात ४१ तालुक्यांत ८२ वसतीगृहे मंजूर केलेली होती.त्या पैकी १० तालुक्यात मुलांचे १० व मुलींचे १० असे २० वसतीगृहे पहील्या टप्यात गेल्या वर्षी सुरू केलेले होते.
आता दुसऱ्या टप्यात उर्वरित ३१ तालुक्यांत मुलांचे ३१ व मुलींचे ३१ असे एकून ६२ वसतीगृहे चालू करणे बाबत शासन निर्णय: बीसीएच-२०२०/प्र.क्र-२८६ / शिक्षण -२ मंत्रालय,मुंबई दि.१० जानेवारी २०२४ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.
या वसतीगृहांचा खर्च गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महा मंडळाच्या निधीमधून करण्यात येणार आहे.
धारूर तालुका हा डोंगराळ व ऊसतोड मजूरांचा तालुका असल्यामुळे ऊसतोड मजूरांच्या मुलांच्या शिक्षणाची हेळसांड होत होती.घरी मुले ठेवली तर सांभाळ व संरक्षणाची जिम्मेदारी असते आणि सोबत घेऊन गेले तर शिक्षणात खंड पडत असे या मुळे अनेक पिढया बरबाद होत होत्या.
परंतू आता धारूर तालुक्यात १०० मुलांसाठी एक व १०० मुलींसाठी एक असे दोन वसतीगृहे सुरू होत असल्यामुळे स्थलांतरीत ऊसतोड कामगारांच्या मुला मुलींच्या शिक्षणाची सोय होऊन तालुक्यांत शैक्षणिक क्रांती होईल असे मत सेवा निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी तथा ईश्वर शिक्षण प्रसारक मंडळ गांजपूर चे सचिव प्रा.ईश्वर मुंडे यांनी व्यक्त केले आहे.