ज्ञानदीप प्राथमिक विद्यालयात दर्पन दिन व पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा संपन्न
किल्ले धारूर तालुक्यातील ज्ञानदीप प्राथमिक विद्यालयात आज 6 जानेवारी दर्पन दिन साजरा करण्यात आला. तसेच दर्पन दिनानिमित्त किल्ले धारूर येथील पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार श्री. प्रकाशजी काळे तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार श्री. सय्यदजी शाकेर सर उपस्थित होते. प्रथमतः आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नंतर उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर श्री. सय्यद शाकेर सर व प्रकाश काळे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. मुंजाराम निरडे सर तर आभार प्रदर्शन श्री. सचिन चव्हाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. यावेळी मोठ्या संख्यानी विद्यार्थी व शिक्षकवृंद उपस्थित होते.