क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात संपन्न
श्रीकृष्ण इंग्लिश स्कूल, धारूर या शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन शाळेच्या विद्यार्थिनी लांडगे गायत्री, श्रुती साठे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवन पटावर मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिबोले कोमल मॅडम व आभार प्रदर्शन आकळे मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेचे संस्थापक तथा प्राचार्य. बी.बी. राठोड सर व सर्व शिक्षक यांनी मेहनत घेतली.