जयसिंह सोळंके यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर
जि.प.चे माजी सभापती जयसिंह सोळंके यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी मोहखेड येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात रक्तदान शिबिर घेण्यात आले.
युवा नेते जयसिंह सोळंके यांच्या ३५ व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात २१ तरुणांनी रक्तदान केले. यावेळी मा. सभापती रवींद्र सोळंके, संरपच सुहास गवळी, उपसंरपच सुंदरराव सोळंके, वीरेंद्र सोळंके, अजित सोळंके, भालचंद्र कुलकर्णी, बाळु सोळंके, सुहास सोळंके, आदर्श सोळंके, संतोष सोळंके उपस्थित होते.