केशर दूध उत्पादक सहकार संघाकडून शेतकऱ्यांची लूट दुधाला भावच मिळेना . शेतकऱ्यांनी केले रस्त्यावर दूध ओतून बोंब आंदोलन .
धारूर तालुक्यातील तेलगाव येथे आजशेतकरी दूध विक्रेते दूध घेणारे यांच्यासह या परिसरातील असंख्य शेतकरी यांनी तेलगाव येथे सकाळी दूध रस्त्यावर ओतून शासनाचा जाहीर निषेध केला दुधाला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे या परिसरातील दूध उत्पादक शेतकरी पूर्णतः वैतागून गेलेला आहे यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे पशुधन कसे सांभाळावे त्यांना चारा उपलब्ध कसा करावा या विवेचं नेतच शेतकरी असताना या दुध डेअरी संघाकडून शेतकऱ्यांचा पिवर म्हशीच्या दुधाला फॅट 6 दिला जातो यामुळे पिवर निरशे दूध पाणी न घातलेले दूध फक्त तीस रुपये ते 35 रुपये दराने विक्री करावी लागते तसेच सध्या पेंडीचे दर ही गगनाला गेलेले असून पन्नास किलो पेंडीची पोते दोन हजार रुपयाला दुकानदाराकडून खरेदी करावी लागते तसेच चारा नसल्यामुळे दहा हजार रुपयाला एक पिकप सोयाबीन बुस्कटाचे जनावरासाठी शेतकऱ्यांना खरेदी करावे लागत आहे अशी बिकट परिस्थिती असतानाही केशर दूध उत्पादक संघाकडून शेतकऱ्यांना कवडीमोल भाव दिला जात आहे नवीन वर्ष तरी दुधाचे भाव वाढावेत अशी अपेक्षा या परिसरातील शेतकरी करत आहेत शेतकऱ्यांच्या हातावर पैसे मिळण्याऐवजी या संघाकडून तुरी दिल्या जात आहेत तत्काळ शेतकऱ्यांचा दुधाचे भाव वाढ करावेत आणि या परिसरातील दूध उत्पादकांना दिलासा द्यावा अशी मागणी या परिसरातील दूध उत्पादक शेतकरी करत आहेत आज दुधाला भावच नसल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी दूध डेअरीला नेणे बंद केलेले आहे आणि घरीच तापवून त्याचे ताक व दही आणि तूप करण्याचे ठरविले आहे तरी याची दखल तात्काळ घेऊन केशर दूध उत्पादक संघाने शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचा फॅट आणि भरघोस प्रमाणात दुधामध्ये दुधाच्या भावामध्ये वाढ करावी अशी मागणी करण्यात आले आहे त्या निषेधार्थ आज तेलगाव येथे आंदोलन करत दूध रस्त्यावर फेकून देण्यात आले यावेळी अंदोलनात . उमेश घोळवे . शिव पुत्र मुंड रमेश मुंडे राम यादव लक्ष्मण मुंडे आदि शेतकरी दूध उत्पादक हाजार होते