किल्ले धारूर महाविद्यालयामध्ये रसायनशास्त्र विषयाचे प्रा. ए. एस. उकंडे यांचा सेवा गौरव समारंभ संपन्न

किल्लेधारूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये कनिष्ठ महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागामध्ये कार्यरत असलेले प्रा. ए. एस. उकंडे नियत वयोमानुसार दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी सेवानिवृत्त होत असल्याने महाविद्यालयाच्या वतीने सेवा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समिती सदस्य श्री. राम शिनगारे होते. त्यांनी अध्यक्षीय मनोगतातून प्रा. ए. एस. उकंडे सरांच्या शैक्षणिक शिस्तीसंबंधी माहिती सांगितली. उत्तम अध्यापनाच्या मुळे अनेक यशस्वी विद्यार्थी घडविले असे सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे यांनी मनोगतातून महाविद्यालयामध्ये रुजू झाल्यापासून आजपर्यंत त्यांनी रसायनशास्त्र विषयाचे अध्ययन-अध्यापन करून विद्यार्थ्यांची सक्षम पिढी उभी केली. शिक्षण सेवेसारखे महत्त्वाचे कार्य त्यांच्या हातून घडले असे सांगितले. आपल्या मनोगतातून प्रा. ए. एस. उकंडे यांनी आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील कारकिर्दीचा आढावा सांगितला. 33 वर्षापेक्षा अधिक कालखंड शिक्षण क्षेत्रात व्यतीत केला. या क्षेत्रात कार्य करण्याची संधी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने उपलब्ध करून दिली याबद्दल संस्थेचे हे ऋण व्यक्त केले. सेवागौरव समारंभाच्या अनुषंगाने प्रमुख उपस्थिती महाविद्यालय विकास समिती सदस्य श्री. इं. ना. जाधव, प्रमुख पाहुणे श्री. अर्जुनराव तनपुरे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच उपप्राचार्य मेजर डॉ. मिलिंद गायकवाड, श्री. विजय शिनगारे, श्री. अनिल महाजन, प्रा. गहिनीनाथ गोयेकर, विद्यार्थिनी कुमारी धोंडगे, दिपाली चव्हाण, नेहा कुरडे, चि.अभिषेक, कन्या स्नेहल व आशा, शिनगारे यांनी आपल्या मनोगतातून भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी विचार मंचावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. महादेव जोगडे, श्री. सिद्धेश्वर रणदिवे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात करता धारूर शहरातील डॉ. मयूर सावंत, पत्रकार श्री. सूर्यकांत जगताप यांबरोबरच शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींबरोबरच नागरिक, पत्रकार तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नितीन कुंभार यांनी केले तर आभार प्रा. विराज देशमुख यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *