राष्ट्रीय शेतकरी दिनाचे औचित्य साधून मौजे चाटगाव येथे पी एम किसान सॅच्युरेशन मोहीम.
धारूर तालुक्यातील चाटगाव येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री बाबासाहेब जेजुरकर व तालुका कृषी अधिकारी चेतन कांबळे यांच्या मार्गदर्शनातून मंडळ कृषी अधिकारी राधा चिरके यांच्या संकल्पनेतून पी एम किसान सॅच्युरेशन मोहीम अंतर्गत राष्ट्रीय शेतकरी दिनाचे औचित्य साधून शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन यांच्या सातबाराला आधार जोडणीचे काम मोहीम स्वरूपात करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या आधार जोडणी साठी आवश्यक असलेल्या ई साईन व ई केवाय सी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या घरी जाऊन करण्यात आल्या. ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नाही व फेस द्वारे इ केवायसी करण्यात अडचण येत असलेल्या शेतकऱ्यांना आधार कार्ड ला मोबाईल नंबर जोडण्याचे काम करण्यात आले. तसेच पी एम किसान सन्माननिधी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे हप्ते थकले आहेत अशा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या बँक खात्याला आधार नंबर जोडून घेण्याबाबत किंवा पोस्टमध्ये खाते काढण्याबाबत माहिती देण्यात आली. या मोहिमेत कृषी सहाय्यक एस एम लामतुरे, कृषी पर्यवेक्षक महेश स्वामी, बालाप्रसाद केंद्रे,सरपंच महादेव नाना केकान, बालासाहेब केकान, पांडुरंग केकान, उद्धव केकान, अर्जुन केकान तसेच दीपक सांगळे, लक्ष्मण सांगळे, ऋषिकेश सांगळे यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.