आंबेवडगाव येथील शेतकरी, ऊसतोड कामगारांचे मागील वर्षी आठ तरुण झाले पोलीस !
धारूर तालुक्यातील आंबेवडगाव हे गाव तीन हजार लोकसंख्या असलेले गाव आहे याच गावातून गेल्या वर्षी आठ पोलीस तयार करून शासन सेवेत रुजू झालेली आहेत शेतकरी, ऊसतोड कामगारांच्या मुलांनी आपल्या आई-वडीलांचे कष्ट संघर्ष डोळ्यासमोर ठेवून पोलीस भरतीत स्थान मिळवले आहे. धारूर तालुक्यातील आंबेवडगाव येथील एक दोन नाही तर तबल आठ विद्याथ्यांनी पोलीस होण्याचे आई- वडीलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. यामध्ये दोन मुली व सहा मुलांचा समावेश आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
धारर तालुक्यातील आंबेवडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व न्यू हायस्कूल आंबेवडगाव येथे गावातच शिक्षण घेतले. गावातच अभ्यासिका असल्यामुळे गोरगरीब लोकांना या अभ्यासिकेचा फायदा झालेला आहे पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी इतर ठिकाणी प्रवेश घेत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. जिद, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर आपल्या आई-वडीलांचा संघर्ष डोळ्यासमोर ठेवून पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगले.आणि ते स्वप्न पूर्णही केले. पोलीस दलात
नोकरदारांचे गाव म्हणून आंबेवडगाची केली ओळख
या गावातील शिक्षक, वकील, तलाठी, वनरक्षक यांच्यासह पोलीस भरती, सैन्य भरती, महसूल विभाग आदी ठिकाणी नैकरदार कार्यरत आहेत तसंच १५ पेक्षा अधिक अधिकार आहेत त्यामुळेच लवकर दाराचे गाव म्हणून आंबेवडगाव ची ओळख या परिसरात झालेली आहे
यांची पोलीस भरतीत निवड झाली
कोमल बालासाहेब नायकोडे(ठाणे शहर), विकास विष्णु भोजणे (पुणे शहर), गोविंद नारायण नायकोडे (अकोला), समाधान लक्ष्मण वाव्हळ(पालघर), सुनित ज्ञानेश्वर घोळवे ( ठाणे )केतन बाबासाहे घोळवे (मुंबई पोलीस), विशाल अनंत तिडके (मुंबई पोलीस), सुनिता हनुमंत मुरकुटे
सोलापूर शहर) यांची पोलीस दलात निवड झाली आहे.