अमेरिकेत पायलटचे प्रशिक्षण पूर्ण करून जिल्ह्यातील पहिला विमान पायलट ठरला :- शंतनू भावठाणकर

किल्ले धारूरचे सुपुत्र शंतनू भावठाणकर यांनी अमेरिकेतील मेरिट आयलंड येथे 14 महिन्यांचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कमर्शियल लायसन पूर्ण केले आणि जिल्ह्यातील पहिला विमान पायलट बनला.
किल्ले धारूर येथील सोन्या-चांदीचे व्यापारी श्री.धनंजय भावठाणकर यांचा मुलगा शंतनू भावठाणकर यांने शंतनूचे चौथीपर्यंतचे शिक्षण धारुर येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत तर माध्यमिक शिक्षण लातूर येथील सरस्वती विद्यालय, नेवासा येथील घाडगे पाटील विद्यालयात झाले. सिंहगड विद्यालयातून बारावीचे शिक्षण पूर्ण केले. बारावी शिक्षणानंतर आपले पायलट होण्याचे स्वप्न उराशी बाळगून शंतनूने औरंगाबाद येथील एमआयटी महाविद्यालयातून इंजिनिअरिंगची पदवी घेतली. यानंतर
मुंबई येथील एअरलाइन प्रिप्रेशन स्कूलमधून डिजीसीएची परीक्षा पास केली. यानंतर त्याला एफएएफए या अमेरिकेतील संस्थेत प्रवेश मिळाला.
दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी शंतनुने आपले प्रशिक्षण पूर्ण करून प्रथम उड्डाण विमानातून आकाशात झेप घेतली
8 मे 2003 रोजी प्रायव्हेट पायलट झाला
दुसरा टप्पा इन्स्ट्रुमेंट रेटींन ( cinstrument pating ) हा दुसरा टप्पा तीन ऑक्टोबर रोजी झाला .
शेवटचा टप्पा कमर्शियल मल्टी इंजीन वीप इन्सट्रमेंट रेटिंग विप सिंगल इंजीन अँड ऑन ही रेटींग 19 नोव्हेंबर रोजी पूर्ण करून दिनांक 12 डिसेंबर रोजी भारतात परतला किल्ले धारूर येथे आल्यावर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. जिल्ह्यातील पहिला पायलट ठरल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *