श्री. दत्त जयंती सप्ताह उत्साहात साजरा

अखिल भारतीय श्री. स्वामी समर्थ सेवा गुरुपीठ त्र्यंबकेश्वर पु.गुरुमाऊली, प्रधान श्री. स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी जि. नाशिकच्या आशीर्वादाने दिंनाक 27 डिंसेबर रोजी श्री. स्वामी समर्थ सेवा, आध्यात्मिक विकास आणि बालसंस्कार केंद्रामध्ये किल्ले धारूर येथे श्री. दत्त जयंती नाम जप सप्ताहानिमित्त व श्री. गुरु चरित्र वाचन श्री. नवनाथ ग्रंथ वाचनाची मोठ्या उत्साहात सांगता झाली.
या सप्ताहात केंद्रात विविध धार्मिक व सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बालसंस्कार, विवाह संस्कार, गर्भधारणा संस्कार, शिशु संस्कार अशा विविध विषयांवर तज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन करण्यात आले.
केंद्र प्रमुख सौ. दीप्ती मिश्रा व तृप्ती मिश्रा यांच्या प्रयत्नातून एक नाटिका दाखवण्यात आली. गुरू माऊलीनी सांगितलेले बाल संस्कार व युवा संस्कार आजच्या काळात कसे महत्त्वपूर्ण आहे याचे प्रबोधन यातून करण्यात आले. 20% अध्यात्म आणि 80% समाजकारण या उक्तीप्रमाणे सेवा केंद्रातर्फे नेहमीच विविध उपक्रम राबवले जातात. सर्व उपक्रमास महिला वर्ग व समाजातील सर्व प्रकारच्या घटका कडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सप्ताहाची सांगता बुधवार 27 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता श्री. स्वामी समर्थ महाराजांची महा आरती व महाप्रसादाने झाली. यावेळी धारूर तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *