तब्बल 50 वर्षा नंतर वर्ग मिञाचा रंगला स्नेह मिलन सोहळा संपन्न

तब्बल पन्नास वर्षांनंतर किल्ले धारूर शहरात इ.स.1973 चे दहावीतील वर्ग मिञाचा स्नेह मिलन सोहळा उत्साहात आणि अनेक सुख दूःखाचे अनुभवांनी रंगला होता.समारोप कार्यक्रमात त्यावेळचे आदर्श शिक्षक अशोकराव चिद्रावार यांची उपस्थिती हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण होते. समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
इ. स.1973 जिल्हा माध्यमिक शाळा धारूरचे वर्ग मिञाचा स्नेह मिलन सोहळा तब्बल पन्नास वर्षांनी आयोजित करण्यात आला होता तेव्हा तीन बॅच मध्ये 110 पेक्षा जास्त विद्यार्थी होते आणि स्नेह मिलन सोहळ्यास 65 ते 70 जनाची उपस्थीती होती .
सकाळच्या सत्रात सर्वांचा परिचय समारंभ होता, प्रत्येकाने आपली कौंटूबीक आणि वैयक्तिक माहिती सांगितली. सकाळच्या सत्रात निधन झालेल्या वर्ग मित्राला व शिक्षकाच्या स्मृतीस श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. प्रत्येकाने आपल्या जीवन अनुभव कथन केले.
समारोप कार्यक्रमात त्यावेळचे आदर्श शिक्षक अशोकराव चिद्रावार यांची उपस्थिती हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण होते. समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या स्नेह मिलन सोहळ्याला वर्गमिञ व मैञीणी मोठ्या संख्येने उपस्थीत होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रदीप दुबे, विवेक डुबे , किरण शेटे , दिनेश शुक्ला , सुमंतराव डुबे ,विष्णूपंत कोमटवार, उत्तमराव जाधव , सुभाष वडगावकर, शक्तीसिंह हजारी आदीनी परीश्रम घेतले शेवटी सर्वाचे अभार किरण शेटे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *