किल्ले धारूर महाविद्यालयात बालविवाह प्रतिबंधक कायदा व वैद्यकीय कार्यशाळा संपन्न
किल्ले धारूर येथील 22 डिसेंबर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी बालविवाह प्रतिबंधक कायदा व वैद्यकीय माहिती या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गोपाळ काकडे तर प्रमुख पाहुणे डॉ.भाग्यश्री भोसले या वेळी उपस्थित होत्या.
प्राथमिक आरोग्य केंद्र धारूर रुग्णालयाच्या सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ.भाग्यश्री भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बालविवाह प्रतिबंधक कायदा समजावून सांगितला व कायद्यातील तरतुदी व संरक्षण याबाबत सविस्तर माहिती दिली. यामुळे विद्यार्थ्यांना बालविवाहाशी संबंधित समस्या आणि दुष्परिणामांची जाणीव झाली.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे होते. विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, या कार्यशाळेच्या माध्यमातून बालविवाह प्रतिबंधक कायदा, वैद्यकीय माहिती याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती दिल्यानंतर विद्यार्थी समाजात कृतीशील होतील, असे त्यांनी सांगितले.
डॉ.अरविंद निकते यांनी विद्यार्थ्यांना बालविवाह प्रतिबंधक कायदा व वैद्यकीय बाबींची सविस्तर माहिती दिली. प्रत्येकाने जीवनात आरोग्याबाबत जागरूक असले पाहिजे. असा संदेशही दिला.
याप्रसंगी विचारमंचावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. महादेव जोगडे, उपप्राचार्य मेजर डॉ. मिलिंद गायकवाड, पर्यवेक्षक प्रा. सिद्धेश्वर काळे तसेच महाविद्यालयातील विद्यार्थिनींची, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन प्रा. प्रताप भानुसे यांनी तर आभार पर्यवेक्षक प्रा. सिद्धेश्वर काळे यांनी व्यक्त केले.