श्रीकृष्ण इंग्लिश स्कूल धारूरच्या बाल वैज्ञानिकांनी 51 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटात प्रथम पारितोषिक पटकावले.

किल्ले धारूरच्या शिक्षण विभागाच्या तालुकास्तरीय 51 व्या विज्ञान प्रदर्शनात धारूर येथील श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रयोग सादर करून प्राथमिक गटात तालुकास्तरावर प्रथम आला असून या प्रयोगाची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.

गटशिक्षणाधिकारी कार्यालय धारूर व हुतात्मा पापा सिंह माध्यमिक विद्यालय किल्ले धारूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५१ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्रीकृष्ण इंग्लिश स्कूल धारूरच्या बाल वैज्ञानिकांनी तालुक्यातून प्राथमिक गटात प्रथम क्रमांक पटकावला. अनुष्का लांडगे, भालेराव साची, सुनुषा सव्वाशे, आर्या तिबोले, वैष्णवी केदार, शर्वरी ठोबरे आदी सहभागी विद्यार्थी होते.या विद्यार्थ्यांना शाळेच्या सहशिक्षक अकले मॅडम व वाघमारे मॅडम यांनी योग्य मार्गदर्शन केले. यामध्ये विद्यार्थ्यांनी आरोग्य व स्वच्छतेचा प्रयोग सादर केला. या प्रयोगात विद्यार्थ्यांनी आरोग्याचे महत्त्व उत्कृष्ट पद्धतीने समजावून सांगितले. श्रीकृष्ण इंग्लिश स्कूल धारूरच्या बाल वैज्ञानिकांनी मिळवलेल्या यशाबद्दल धारूर पंचक्रोशीतील पालकांनी विद्यार्थी व शाळेचे कौतुक केले. श्रीकृष्ण इंग्लिश स्कूल धारूरच्या बाल शास्त्रज्ञांनी मिळवलेल्या यशाबद्दल मान्यवरांच्या उपस्थितीत प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले व तालुकास्तरावरून प्रथम क्रमांक देऊन शाळेची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी मान्यवरांच्या हस्ते निवड करण्यात आली. शाळेच्या वतीने शाळेचे संस्थापक अध्यक्ष व मुख्याध्यापक श्री.बाळासाहेब राठोड यांनी या प्रयोगात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *