धारूर महाविद्यालयांमध्ये विकसित भारत @ 2047 या विषयावरील व्याख्यान संपन्न

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये किल्ले धारूर दिंनाक 11 डिसेंबर 2023 राष्ट्रीय सेवा योजना व आयआयसी विभागाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत @ 2047 या विषयावरील ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन महाविद्यालयाच्या सभागृहांमध्ये करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे यांनी केले. या व्याख्यानातून विकसित भारत @ 2047 याविषयी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींचे विचार सर्वांनी आत्मसात करावेत असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी डॉ. आर. आर. भोसले यांनी केले. विकसित भारत @ 2047 या विषयावरील कार्यक्रमाच्या आयोजन मागील भूमिका विद्यार्थ्यांना समजावून दिली. याप्रसंगी कार्यक्रमाकरिता महाविद्यालयाचे उपराचार्य प्रा. महादेव जोगडे, उप प्राचार्य मेजर डॉ. मिलिंद गायकवाड, पर्यवेक्षक प्रा. सिद्धेश्वर काळे, आयआयसी सेल समन्वयक व कार्यक्रमाधिकारी डॉ. आर. आर. भोसले, कार्यक्रमाधिकारी डॉ. विजयकुमार कुंभारे, कार्यक्रमाधिकारी डॉ. डी. बी. जाधव यांबरोबरच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व विद्यार्थी या विषयावरील ऑनलाइन व्याख्यानासाठी सभागृहामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *