आई-वडिलांची काळजी न घेणाऱ्या व्यक्तीस नाते प्रमाणपत्र नाही.

ग्रामपंचायत असरडोहच्या ग्रामसभेतील ठराव

धारूर तालुक्यातील असरडोह ग्रामसभेने निर्णय घेतला की गावात जो कोणी आपल्या आईवडिलांची काळजी घेत नाही त्याला ग्रामपंचायतीकडून नातेसंबंध प्रमाणपत्र मिळणार नाही. या ऐतिहासिक निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
धारूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आसरडोह येथील ग्रामसभेत आई-वडिलांची काळजी न घेणाऱ्या व्यक्तीला ग्रामपंचायतीकडून नातेसंबंध प्रमाणपत्र मिळणार नाही. ठराव घेण्यात आला. मुलांनी त्यांच्या पालकांची काळजी घ्यावी, या उद्देशाने हा ठराव घेण्यात आला.
ग्रामसभेत माजी चेअरमन विष्णू शिंदे यांनी गावातील जे लोक आई-वडिलांचा सांभाळ करणार नाहीत, त्यांना नातेसंबंधाचे प्रमाणपत्र देऊ नये, त्यामुळे न्यायालय त्यांना वारस प्रमाणपत्र देणार नाही, अशी सूचना केली. या ठरावाला रवी देशमुख यांनी अनुमोदन दिले. हा महत्त्वपूर्ण ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच मंगल आबासाहेब देशमुख होत्या. ठरावाचे वाचन ग्रामसेवक आर.डी. पाठक यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *